मुंबई /-
भाजपमधील नाराज नेत्या पंकजा मुंडे व माजी मंत्री विनोद तावडे यांना भाजपनं अखेर राष्ट्रीय स्तरावर संधी दिली आहे.या दोघांचीही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी वर्णी लागली आहे. भाजपचे दुसरे नाराज नेते एकनाथ खडसे यांना मात्र यात स्थान मिळालेले नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यात राष्ट्रीय मंत्री म्हणून पंकजा मुंडे व तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे.त्याचबरोबर, महाराष्ट्रातून विजया रहाटकर व सुनील देवधर यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर, अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नागपूरचे जमाल सिद्धिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.