पिंगुळीत भाजप पक्षाला धक्का;अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

पिंगुळीत भाजप पक्षाला धक्का;अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे झालेल्या या प्रवेशावेळी आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.माजी जी.प.अध्यक्ष विकास कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यामध्ये पिंगुळी येथील प्रकाश गावडे ,कपिल म्हापसेकर,नारायण नेमन,चेतन राऊळ,दत्तगुरू राऊळ,रूपेश धुरी ,सतीश राऊळ,दिनेश पिंगूळकर,प्रवीण धुरी ,प्रसाद प्रभू,बाबली नेमन ,जयराम धुरी ,किरण म्हापसेकर यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते , तालुकाप्रमुख राजन नाईक, संतोष शिरसाठ, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, उपसभापती जयभारत पालव, सरपंच निर्मला पालकर,भरत परब ,रामदास करंगुटकर,शोहेब खुल्ली, सतीश धुरी ,चेतन राणे, मिलिंद परब, विष्णू धुरी, उपसरपंच सागर रणसिंग, सिद्धेश धुरी, महेश पालकर, प्रमोद पांगुळ, बबलू पिंगुळकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..