मुंबईत एवढे कोरोनाबाधित आढळले..

मुंबईत एवढे कोरोनाबाधित आढळले..

मुंबई /-

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरू आहे. गेल्या २४ तासात मुंबईमध्ये १८७६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान गेल्या २४ तासात मुंबईमध्ये ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पुन्हा ८१ टक्के झाली आहे, तर रुग्णदुपटीचा कालावधीही वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या वाढवली असून दिवसाला १५ हजार चाचण्या करण्यात येत आहेत.मुंबईत एकूण रुग्णसंख्या १ लाख ९४ हजार १७७ वर गेली आहे, तर दिवसभरात ११६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत १ लाख ५६ हजारांहून अधिक म्हणजेच ८१ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २८,२७३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

अभिप्राय द्या..