नवी दिल्ली /-
कोरोनाचाशी संपूर्ण जग सामना करत आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी भारतासह अनेक देश प्रयत्नशील आहेत.भीती : कोरोनाचा प्रतिबंध करणारी यशस्वी लस येण्यापूर्वी जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात, अशी भीती WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. तूर्तास तरी ही शक्यताच आहे, मात्र ही एक दुःखद बाबच आम्ही मानतो आहोत. सध्याच्या घडीला जगभरात कोरोनाची बाधा झालेले रुग्ण हे ३ कोटी २० लाखांपेक्षा जास्त आहेत.माईक रेयान UN एजन्सीच्या इमर्जन्सी प्रोग्रामचे प्रमुख यांनीही ही भीती बोलून दाखवली आहे. कोरोनाची बाधा होऊन मागील ९ महिन्यांमध्ये ९.९३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे अशीही माहिती त्यांनी दिली. येत्या काळात लस येण्याआधी ही संख्या दुप्पट होईल म्हणजेच प्रभावी लस येण्याआधी २० लाख मृत्यू होऊ शकतात ही शक्यता अधिक आहे असंही रेयान यांनी म्हटलं आहे.