सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात दुधसंकलन बाबतीत आम्ही पाच वर्षाचं नियोजन केलंय परंतु चौथ्या वर्षाच्या आत मध्ये एक लाख लिटर दूध या जिल्ह्यातनं गोकुळ दूध संस्थेला गेलेलं असेल . त्याच्यासाठी लागणारे जे काही पूर्वनियोजन आहे ते सहा महिन्यांमध्ये आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून करू. या सगळ्यात भगीरथचे फार मोठे योगदान, सहकार्य जिल्हा बँकेला मिळालेलं आहे. त्यामुळे ज्यांचे ज्यांचे सहकार्य मिळतं त्यांना धन्यवाद देणे हे ख-या अर्थाने आमच्या सारख्या शेतकरी प्रतिनिधीचे कर्तव्य आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला शेतीबरोबर त्याचा मुख्य व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्याचा संकल्प जिल्हा बँकेच्या वतीने आम्ही केलेला आहे. म्हणून आम्ही गोकुळच्या सोबत असुन गोकुळच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत.गोकुळला विनंती आहे की गोकुळ दुध संघ जे जे काही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुधउत्पादकाला देतात ते ते सर्व काही येथील दुधउत्पादकाला द्या. दूध संकलन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जी जी काही तज्ञ मंडळी आपल्या आपल्याकडे उपलब्ध आहेत.जी काही ताकत आपल्याकडे आहे ती सगळी ताकत थोड्या कालावधीसाठी, पहिल्या एक दोन वर्षासाठी गोकुळ मार्फत या जिल्ह्यामध्ये उभी करा असं प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यानी मळगांव येथे केले.

डॉ.हेडगेवार प्रकल्प अंतर्गत कल्पवृक्ष दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था कुंभार्ली,मळगांव यांच्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कोल्हापूर (गोकुळ) क्लस्टर बल्क मिल्क कुलर युनिटचा भव्य उद्घाटन सोहळा जिल्हा बँकेचे अध्यश मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.सदर सोहळा कल्पवृक्ष दुध शीतकरण केंद्र मळगांव येथे संपन्न झाला. या सोहळ्यास कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) चे अध्यक्ष विश्वासराव पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गोकुळचे बाबासाहेब चौगुले, बाबासाहेब खाडे,अजित नरके,विजयसिंह मोरे, नंदकुमार डेंगे,कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगांवकर,विद्याधर परब, अरुणजी डोंगळे,बयाजी शेळके, मळगांव गावच्या सरपंचा स्नेहल जामदार, प्रमोद गावडे,डॉ.प्रसाद देवधर, योगेश गोडबोले, अंजलीताई रेडेकर, कल्पवृक्ष संस्था अध्यक्ष संतोष सामंत, उपाध्यक्ष श्रीम.भाग्यश्री केरकर, रूपाली राऊळ, रामकृष्ण पंतवालावलकर व कल्पवृक्ष संस्थेचे संचालक,पंचक्रोशीतीलशेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले नऊ वर्ष या जिल्ह्यामध्ये २६० लिटर वरून २२००० लिटरपर्यंत दुधसंकलन जाण्यापर्यंत जे जे काही चांगले वाईट अनुभव या जिल्ह्याच्या माध्यमातून गोकुळने घेतले त्याबद्दल मी मनापासून गोकुळला धन्यवाद देतो याचं कारण असं आहे की गोकुळला लाखो लिटरच्या संकलनाची सवय आहे आणि करोडो रुपयांमध्ये गणित घालण्याची सवय आमच्या जिल्ह्यांमध्ये २६० लिटर दुध संकलन पहील्या दिवशी झालं. त्यात २६०लिटर दुधाची किंमत ही कदाचित तुम्हाला प्रति लिटर तुमच्याकडे खरेदी साधारण दोनशे तीनशे रुपयांनी पडली असेल त्याच्या वाहतुकीचा सहज हिशोब घातला तर आणि एवढा मोठा तोटा सहन करून सुद्धा आज आम्ही तुम्ही नऊ वर्ष आमच्या जिल्ह्याबरोबर राहिला आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जो विश्वास दिला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो कारण फक्त व्यवसायिकता म्हणून विचार केला नाही कारण व्यवसाय म्हणून जर तुमच्या जागेवर कदाचित मी निर्णय घेणारा पदाधिकारी म्हणून कदाचित असतो तर मी म्हटलं असं किती दिवस वाट पाहावी आता एवढी वर्ष झाली दोन वर्ष झाली पाच वर्षे झाली.आता जवळपास आपण नऊ वर्षापर्यंत आलोय आणि २२००० लिटर दूध संकलन होतंय त्याचं इथून पॅकिंग करून ते प्रक्रिया करणं तुमच्यापर्यंत नेणं वाहतूक करणे आणि पुन्हा एकदा मार्केटमध्ये विकलं जाणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही दूध संकलन होते. एक लाख लिटर दुधाचा नफा संस्था म्हणून तुम्हाला आमच्यावर खर्च करावा लागतोय आणि म्हणून तुम्ही नऊ वर्षांमध्ये आमच्या जिल्ह्याच्या या दूध संकलनातन रुपयाचा फायदा न मिळवता लाखो आणि कोट्यावधी रुपये आमच्या जिल्ह्यावर जे खर्च केलात त्याच्याबद्दल जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून मी ऋण व्यक्त करतो कारण ताळेबंद सहकारी संस्थाचे काय असतात आणि प्रत्येक ताळेबंदामध्ये आपण नफ्या तोट्याचा कशाप्रकारे उपयोग विचार केला पाहिजे अशा या सगळ्या गोष्टींवर रोज सकाळ संध्याकाळ विचार करणारी मंडळी आम्ही आहोत आणि म्हणून आम्हाला ताळेबंदाची माहिती असल्यामुळे आम्हांला त्याचं महत्त्व माहिती आहे. एखाद्या संस्थेने जिल्ह्यासाठी नऊ वर्ष तोटा सहन करावा तो सुद्धा आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन त्याच्याबद्दल गोकुळचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. असे शेवटी मनीष दळवी म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page