डॉ.डि वाय पाटिल साखर कारखान्याचा २० वा गळीत हंगामाचा शुभारंभ सोहळा संपन्न..

वैभववाडी /-

जिल्हा बँक आणि या कारखान्याचे ऋणानुबंध आहेत आणि ते ऋणानुबंध कायम राहतील. आपल्या या सगळ्या यशस्वी वाटचालीमध्ये आम्ही आपले सहकारी म्हणून तुमच्या सोबत कायमस्वरूपी आहोत.आमची जिल्हा बँक निश्चितपणे डि वाय पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बरोबर राहील. जिल्ह्यामध्ये उसाचे उत्पन्न हे नगन्य होत होतं.वैभववाडी तालुका हा या कार्य क्षेत्रामध्ये सहभागी झाला.जसजसा या कारखान्यांमध्ये नफा मिळायला लागला योग्य दर मिळायला लागला तसा तसा आमच्या भागामध्ये या निमित्ताने उसाची लागवड वाढायला लागली यावर्षी सुद्धा ऊस क्षेत्राच्या लागवडीमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याचं खरं श्रेय हे डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याला जातं आणि म्हणून या स्वार्थापोटी सुद्धा म्हणा की आम्ही असं म्हणतो की आमच्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून या साखर कारखान्याचे मोठं योगदान आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी गगनबावडा येथे केले.

गगनबावडा तालुक्यातील शांतीनगर, वेसरफ-पळसंबे येथील डॉ.पदमश्री डॉ.डी.वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२-२३ चा २० वा गळीत हंगाम शुभारंभ पार पडला.यावेळी आम.बाळासाहेब पाटील,खा.संजय मंडलिक,कारखान्याचे चेअरमन आ.सतेज उर्फ बंटी पाटील,गोकुळ दुध संघ अध्यश विश्वास पाटील,संचालक बयाजी शेळके,संजय पाटील,बाबासाहेब चौगले,चेतन नरके, प्रकाश पाटील, श्रीम.स्मिता गवळी जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगांवकर,समिर सावंत, प्रकाश बोडस, आत्माराम ओटवणेकर, विद्याधर परब,श्रीम. प्रज्ञा ढवण, श्रीम. निता राणे, कारखान्याचे अधिकारी जयदीप पाटील,बंडोपंत कोटकर, कारखाना संचालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मनिष दळवी म्हणाले जिल्हा बँक व कारखाना यांचं नातं अतूट आहे.२०२१-२२ मध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये उसाचे जे पेमेंट या कारखान्या कडून केलं गेलं. मी मनापासून जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माझ्या शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी या साखर कारखान्याच्या सगळे चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळाला मनापासून धन्यवाद देतो. सतेज पाटील साहेब ज्या पद्धतीने आम्हाला आपलंसं समजून या ठिकाणी सोबत घेऊन चाललाय तसेच कृपादृष्टी या पुढच्या काळामध्ये सुद्धा ठेवा आणि आमच्या या वैभववाडी तालुक्या बरोबर आता हळूहळू कणकवली तालुक्यामध्ये सुद्धा ऊस लागवड सुरू झालेली आहे. कुडाळ तालुक्यामध्ये लागवड सुरू झाली आहे.आणि गेल्या वर्षी या रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्याबाबत पहीलं निवेदन शेतकऱ्यांचे माझ्याकडे आलं होतं. वाहतूकदार अधिकच रक्कम मागतात काय करायचं तेंव्हा पाटील साहेब म्हणाले की ठीक आहे थोडा हिस्सा आम्ही घेऊ थोडा हिस्सा तुम्ही घ्या आणि काय करायचा तो निर्णय तुम्ही घ्यायला लागा तुम्ही घ्याल त्या निर्णयामध्ये आम्ही आहोत. मागच्या हंगामामध्ये आमच्या शेतकऱ्यांना पाठबळ दिलं शेतकऱ्यांच्या खिशातला पैसा खर्च होता नये या दृष्टिकोनातन जी भूमिका आपण घेतली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.यावर्षी सुद्धा रस्त्याची काहीशी परिस्थिती तीच आहे.त्यामुळे नजीकच्या काळामध्ये थोडी दुरुस्ती होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहीजेत.पालकमंत्री रविंद्र चव्हाण य़ांना पहिलं निवेदन माझं होतं की या ठिकाणी हा रस्ता व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा त्यांनी तसा शब्द दिलाय आणि त्यामुळे मला यावर्षी खात्री आहे की दुरुस्ती लवकर च्या नजीकच्या काळामध्ये होईल आणि आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सहकारी म्हणून सोबत घेऊन जे चाललाय नजीकच्या काळामध्ये हा आदर्श आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा घेतला जाईल. आणि आमच्या जिल्ह्यातला अधिक शेतकरी या ऊस उत्पादनाकडे वळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या कारखान्याच्या माध्यमातून आपण जे पाच लाखाचं उद्दिष्ट ठेवलेले आहे ते निश्चितपणे या वर्षीच्या हंगामामध्ये पूर्ण होईल परंतु ते पूर्ण होण्याच्या पलीकडे मला असं वाटतं की हा कारखाना महाराष्ट्रामध्ये एक आदर्श कारखाना म्हणून आदर्श संस्था म्हणून त्या ठिकाणी पुढे आली पाहिजे.बंटी पाटील साहेब म्हणाले की यावर्षीचा उद्दिष्ट आमचं पाच लाखाचा आहे ज्या दिवशी बंटी पाटील साहेब याच व्यासपीठावर उभे राहून म्हणतील की या कारखान्याचे यावर्षीचे उद्दिष्ट दहा लाखाचा आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा मी या ठिकाणी उपस्थित राहीन अस शेवटी मनिष दळवी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page