मालवण /-
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ परीक्षा ऑक्टो. 2020
तृतीय वर्षाच्या बी. ए., बी. कॉम. , एम. ए. या परीक्षेचे वेळापत्रक मा. उदयजी सामंत (उच्च शिक्षण मंत्री) यांनी रविवारी नाशिक येथील मुख्यालयात घेतलेल्या बैठकीनंतर २३ सप्टेंबर रोजी जाहीर केले आहे
त्यानुसार या विद्यापीठा च्या सर्व परीक्षा ५ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर, २०२० या कालावधीत होणार आहेत.
ज्याप्रमाणे मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रश्नांवली (Que Bank) उपलब्ध करून दिली आहे
त्याप्रमाणे याही विद्यापीठाच्या शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्रश्नांवली (Que Bank) उपलब्ध करून देण्यास परवानगी द्यावी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी हा नियमित विद्यार्थी नसून कामधंदा, नोकरी-व्यवसाय सांभाळून शिकत असतो
कोरोना काळात हा नोकरदार विद्यार्थी अभ्यासापासून देखील थोडाफार दूर गेला हे देखील सत्य आहे. अश्यातच या परिक्षा थेट online होणार असल्याने हा नोकरदार विद्यार्थी प्रचंड संभ्रमावस्थेत व दडपणाखाली आहेत.
त्यामुळे भविष्यात या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता असून वर्ष फुकट जाण्याची शक्यता असल्याने.
उच्च तंत्र शिक्षणमंत्री श्री. उदयजी सामंत यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून
मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रश्नांवली (Que Bank) उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मगणी श्री.अरविंद मोंडकर यांनी केली आहे.