सावंतवाडी /-

कलम बांधणी प्रात्यक्षिकचे विद्यार्थांना दिले धडे देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे अंतर्गत बळिराजासाठी एक दिवस या स्तुत्य उपक्रमाचे औचित्य साधुन जि.प.प्राथमिक शाळा वेर्ले नं.३ या प्रशालेत आंबा कलम बांधणीचे प्रात्यक्षिक स्वरुपात मार्गदर्शन कवी तथा रांगोळीकार कृषी विषयाची आवड असणारे मनोहर परब यानी केले.यावेळी खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक चंद्रकांत राऊळ,शा.व्य.समितीचे अध्यक्ष हेमलता मेस्त्री,विनया बिडये,भावना राणे,राऊळ तसेच पालकवर्ग,विद्यार्थी उपस्थित होते.
कोकणात शेती व्यवसाय हा मुख्य असल्याने भात पिक लागवड तसेच फळझाड लागवड केली जाते.या अनुषंगाने व्यवसायिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन मुलांना कलम बांधणीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळू शकते तसेच कलम बांधणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी तसेच शेतीविषयक अवजारांची माहिती ,रानभाजी पाल्याची ओळख आणी आरोग्यासाठी लाभदायक या विषयी सविस्तर मार्गदर्शन मनोहर परब यानी केले.तसेच भात शेतीविषयक आवड निर्माण होण्यासाठी प्रत्येकानी भात लागवड केली पाहिजे.विद्यार्थ्यांनी आवड निर्माण करावी याबाबत मार्गदर्शन चंद्रकांत राऊळ यानी केले.यावेळी काही मुलानी कलम बांधणीचे प्रात्यक्षिकही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page