You are currently viewing कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वीज, पाणीपुरवठा सुरळीत सुदीप कांबळे, प्रदीप मांजरेकर यांनी केली पाहणी

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वीज, पाणीपुरवठा सुरळीत सुदीप कांबळे, प्रदीप मांजरेकर यांनी केली पाहणी

कणकवली /-

लाईट आणि पाण्या अभावी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड सत्यशोधक सेक्युलर फ्रंट चे राज्य निमंत्रक ऍड. सुदीप कांबळे, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष ऍड. महेश परुळेकर यांनी चव्हाट्यावर मांडली होती. त्यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णलयातील वीजपुरवठा सुरळीत झाला असून पाण्याचीही सोय उपलब्ध झाली आहे. सुदीप कांबळे मांजरेकर, परुळेकर यांनी थेट उपजिल्हा रुग्णालयात जाऊन ऍडमिट असलेल्या रुग्णांशी संवाद साधल्यानंतर 4 दिवस लाईट नसल्यामुळे शस्त्रक्रिया होऊ शकल्या नसल्याचे दिसून आले होते. लाईट नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये पाणीही नव्हते. पाण्याअभावी रुग्णांना आंघोळ, नैसर्गिक विधी साठी बाहेरून पाणी आणावे लागत होते. याचा जाब विचारत अत्यावश्यक सुविधा तात्काळ पुरवल्या नाही तर उपजिल्हा रुग्णालयासमोर आंदोलनाचा इशारा ऍड सुदीप कांबळे यांनी दिला होता. त्याची दखल घेत तात्काळ वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. आज ऍड सुदीप कांबळे, प्रदीप मांजरेकर यांनी रुग्णलयात जात पाहणी करून वैद्यकीय अधिकारी हनुमंते यांनारुग्णांना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत चर्चा केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा