वैभववाडी /-
जनसंघाचे संस्थापक पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त व जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून संताजी रावराणे यांच्या संकल्पनेतून जागतिक फार्मासिस्टना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .वैभववाडी शहरातील रजिस्टर फार्मासिस्ट(मेडिकल) विक्रेते यांनी कोरोना महामारीच्या काळात जनतेची सेवा केली.त्याबद्दल वैभववाडी शहरातील औषधे विक्रेत्यांचा भारतीय जनता पार्टी वैभववाडी यांच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित माजी सभापती अरविंद रावराणे, नगरसेवक तथा जिल्हा सचिव,केमिस्ट असो संजय सावंत ,नगरसेवक तथा रजि. फार्मासिस्ट संताजी रावराणे,प्राची तावडे ,प्रदीप नारकर, दाजी पाटणकर,प्रकाश पाटील,आशिष रावराणे(भाजपा शहर अध्यक्ष ,सोशल मिडिया शंकर स्वामी,प्रथमेश पडवळ,अमोल रावराणे, व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.