You are currently viewing दाभोली-खानोली येथे डंपरच्या मागील चाकाखाली चिरडून वृद्ध जागीच ठार.

दाभोली-खानोली येथे डंपरच्या मागील चाकाखाली चिरडून वृद्ध जागीच ठार.

वेंगुर्ला /-

दाभोली-खानोली येथे डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडून ६३ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडे बारा वाजता दाभोली-हळदणकरवाडी हम रस्त्यावर घडली. बाबुराव गंगाराम मयेकर, असे त्यांचे नाव आहे. याबाबत वेंगुर्ला पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

तर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अतुल जाधव यासह पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. तसेच दाभोली सरपंच उदय गोवेकर पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर, कोतवाल सुभाष खानोलकर, मिलन चव्हाण, उपसरपंच सुभाष खानोलकर, खानोली ग्रामसेवक प्रसाद अंधारी यासह स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

या मार्गावरून पुढील प्रवासासाठी जात असलेल्या वेंगुर्ले-दाभोलीमार्गे सांगली तसेच दाभोली मार्गे कुडाळ याबरोबरच दाभोली मार्ग वेंगुर्लेकडे येणाऱ्या एसटी बस गाड्याही अपघाताच्या अन्य खाजगी वाहने अपघाताच्या दुसऱ्या बाजूला या रस्त्यावर अडकून पडलेले होती. हा अपघात ज्या ठिकाणी घडला. त्या ठिकाणाहून बाबुराव मयेकर यांचे घर सुमारे सातशे मीटर अंतरावर होते.

अभिप्राय द्या..