कणकवली /-

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतर करण्याची कार्यवाही न झाल्यास १५ जूनपासून सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोरील जागेत बेमुदत उपोषणास बसणार आहोत, असा इशारा कणकवली शहर भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष अण्णा कोदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

त्यानुसार 15 जूनपासून उपोषण करण्यात येणार असून या उपोषणाला कणकवली तालुक्यातील शिवप्रेमींनीही उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी केले आहे.

कणकवली शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ अंतर्गत कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सर्विस रस्त्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरण करण्यासंदर्भात पालकमंत्री यांनी आश्वासन दिले होते. या संदर्भात त्यांनी कणकवली नगरपंचायत येथे बैठक घेऊन यावर चर्चा करत एक महिन्यामध्ये यावर योग्य तोडगा काढून त्यानंतर पुतळा स्थलांतरित करण्यात येईल असे सांगित होते. मात्र, अद्याप पुतळ्याचे स्थलांतरण झाले नसल्याने कणकवली शहर भाजपच्या वतीने उद्या १५ जूनपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत प्राताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात भाजपा पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कणकवली नगरपंचायतने जागाही उपलब्ध करून दिली होती. मात्र, असे असताना जून महिना आला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यात आलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या आजूबाजूला अपघात घडत आहेत, त्यामुळे आपण उपोषणास बसत असल्याचे अण्णा कोदे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page