कणकवली /-

केतकी चितळे यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका दुर्दैवी आहे.अभिनेत्रीने आपले अभिनयाचे काम करावे, नाहक प्रसिद्धीसाठी नुसते उपद्व्याप करू नये,अन्यथा तुमची जागा दाखवून द्यावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांनी दिला आहे.

दरम्यान याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शासनाने सुद्धा त्यांच्यावर कडक कारवाई करावी, जेणेकरून यापुढे अशा प्रकारे कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर टीका करणे कोणालाच शक्य होणार नाही, असेही निलेश गोवेकर त्यांनी म्हटले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले यांनी आहे. चितळेंनी पक्षाध्यक्ष पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page