वेंगुर्ला /-

उभादाडा-वरचेमाडवाडी येथे कॅनिंगसाठी आंबा चोरी केल्याच्या संशयावरून वेंगुर्ला शहरातील डचवखार येथे रहाणा-या व्यक्तीस ७ जणांनी मारहाण केल्याची घटना दि.९ मे रोजी रात्रौ ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून आलेल्या सुचनानुसार या घटनेचा तपास करीत दि.१२ मे रोजी संबंधित व्यक्ती गौतम वेंगुर्लेकर याची फिर्याद पोलीसांनी घेतली आहे. त्यात फिर्यादिने नावे दिलेल्या ७ संशयितावर मारहाण केली, मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल केला तसेच जातीवाचक बोलल्यावरून अट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे.मात्र यातील आरोपी नयन केरकर याला पोलिसांनी सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव झिरोम येथून रविवारी ताब्यात घेऊन अटक केली आहे.तर उर्वरित इतर सहा आरोपी आज सोमवारी वेंगुर्ले पोलिसांत स्वतःहून हजर झाल्याने वेंगुर्ले पोलिसांनी त्यांना अटक केली असून,उदया मंगळवारी या सातही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उभादांडा-वरचेमाडवाडी येथे दि.९ मे रोजी रात्रौ आंबा चोरी केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीस मारहाणी केली.मारहाणीचा व्हीडीओ करून तो व्हायरल केला. तो जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यापर्यत गेल्याने या प्रकरणी वेंगुर्ले पोलीसांना चौकशी करून कारवाईच्या सुचना दि.१० मे २०२२ रोजी देण्यात आल्या होत्या. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या सुचनेनुसार वेंगुर्ले पोलीसांनी तपास करीत गौतम वेंगुर्लेकर याची तक्रार दि.१२ मे रोजी घेतली.या तक्रारीत कोणतेही कारण नसताना आपणास मारहाण करीत मारहाणीचा व्हीडीओ काढला, सदरचा मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल केला बरोबरच जातीवाचक बोलून अपमान केल्याचे नमुद आहे.तसेच या तक्रारीत मारहाण करणाऱ्या संशयिताची नावे सुध्दा दिली आहेत.यात प्रसाद मांजरेकर, प्रतिक धावडे,रावशा शेलार, गौरव मराठे, नयन केरकर, दिनेश गवळी,योगी सरमळकर या सात संशयितानी आपणास मारहाण केली.या प्रकरणी वेंगुर्ले पोलीसांनी संशयित ७ ही जणांसह एकूण १० ते १२ जणांवर गौतम वेंगुर्लेकर यांच्या तक्रारीनुसार दि. १२ मे रोजी याप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी सर्वावर मारहाण,जातीवाचक बोलून,अपमान केल्याप्रकरणी भादंवि कलम 324,141,143,144,147,149,342,504,506 माहिती तंत्रज्ञान सुधारणा २००८ च्या कलम ६६ (ई),६७ व अॅट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्रकुमार दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती साळुंखे या करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page