आचरा हिर्लेवाडी येथील इसमाची गळफास लावून आत्महत्या

आचरा हिर्लेवाडी येथील इसमाची गळफास लावून आत्महत्या

आचरा /-

आचरा हिर्लेवाडी येथील किशोर गोपाळ पेडणेकर वय 41 या विवाहित तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात खोलीतील छप्पराच्या वाशाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर त्यांचा भाचा अमित राजन गांवकर यांनी आचरा पोलीस स्टेशनला दिली आहे. सदर घटना बुधवारी रात्री अकरा ते सकाळी सात या दरम्यान घडल्याचे बोलले जात आहे.

किशोर गोपाळ पेडणेकर हे पत्नी किर्ती व मुलासह हिर्लेवाडी येथील आपल्या घरी राहत होते. त्यांना टीबीचा आजार होता.तसेच दारुचेही व्यसन होते. गुरुवारी सकाळी त्यांची पत्नी किर्ती हिला जाग आल्यावर किशोर पेडणेकर यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत दिसल्याने तीने ओरड मारली. या बाबतची खबर अमित राजन गांवकर यांनी आचरा पोलीस स्टेशनला दिली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर आचरा पोलीस, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी हे घटनास्थळी दाखल झाले होते.

किशोर पेडणेकर यांच्या मुलाने आचरा पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार किशोर पेडणेकर हे सायंकाळी दारु पिऊन घरी आल्यावर पुन्हा परत रात्री बाहेर जाऊन दारू पिऊन आले होते. त्यामुळे ते न जेवताच झोपल्याने आम्ही पण न जेवताच झोपलो. सकाळी आईला जाग आल्यावर तीने मला हलवून जागे केले तेव्हा वडिलांचा मृतदेह लोंबकळताना दिसून आला. या बाबत आचरा पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील चव्हाण, देसाई, बाळू कांबळे करत आहेत.

अभिप्राय द्या..