आचरा /-
करूनी दान रक्ताचे,जपूया नाते माणूसकीचे या उक्तीला अनुसरून श्री देव वाघेश्वर ग्रामस्थ तोंडवळी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४७ रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत भासत आहे. अनेक लोक आजारी पडत आहेत .त्याच प्रमाणे आपल्या काही गरजू बांधवांना रक्ताची गरज असताना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी आपलाही या सामाजिक कार्यात योगदान असावे या उद्देशाने श्री देव वाघेश्वर ग्रामस्थ तोंडवळी मंडळाच्या माध्यमातून सर्व तोंडवळी ग्रामस्थ एकत्र आले.व त्यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले. या रक्तदान शिबीरात वायंगणी , आचरा , तोंडवळी गावातील ४७ रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले .त्यांच्या या सामाजिक कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.