वेंगुर्ला /-

माझे कुटुंब – माझी जबाबदारी* या अभियाना अंतर्गत केळुस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाने कोविड 19 नियंत्रीत करणे तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” ही मोहीम सुरु केली असुन ती *दि.15/09/2020 ते दि. 10/10/2020 याकालावधीत पहिली फेरी व दुसरी फेरी दि.14/10/2020 ते दि.24/10/2020 कालावधीत गावामध्ये राबविली जाणार आहे. या अंतर्गत *आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका, आशा घरोघरी जावून कुटुंबातील सर्व सदस्यांचे तापमान तपासणे, सर्दी खोकला आहे का याची तपासणी करणार आहेत. तरी कुणीही अशी लक्षणे असल्यास ती घाबरुन जावून दडवून न ठेवता सांगावयाची आहेत. त्यामुळे योग्य तो उपचार करणे शक्य होणार आहे. तरी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य उपकेंद्र केळुस तसेच ग्रा. पं.केळुस यांचेकडून करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून केळुस ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक दि.21/09/2020 रोजी घेण्यात आली.

यावेळी सरपंच श्री.किशोर केळुसकर उपसरपंच श्री. आबा खवणेकर व ग्रामसेवक श्री. विवेक वजराटकर सदस्य कमलाकर वेंगुर्लेकर आरोग्य सेवक श्री. नारायण पेडणेकर आरोग्य सेविका श्रीम. मांजरेकर आशा स्वयंसेविका सपना केळुसकर, सुचीता केळुसकर अंगणवाडी सेविका श्रीम. संगीता केळुसकर, राजकीर्ती केरकर, शांती साटम, किरण रेवणकर कृती समिती सदस्य श्रीम. स्मिता राऊळ अंगणवाडी मदतनीस श्रीम.अंजली केळुसकरआदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page