You are currently viewing भारनियमनाच्या मुद्द्यावरून पत्रकारावर झालेल्या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांचे 20 मे रोजी उपोषण..

भारनियमनाच्या मुद्द्यावरून पत्रकारावर झालेल्या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांचे 20 मे रोजी उपोषण..

सिंधुदुर्ग /-

जिल्ह्यात सावंतवाडी शहरातील पत्रकार विनायक गावस यांना भारनियमनाच्या मुद्द्यावरून विनाकारण गुन्ह्यात गोवण्यात आले आहे.यासंदर्भात दाद मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 मे रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार कृष्णा उर्फ आबा खवणेकर यांनी दिली.

कोकणसाद लाईव्हचे प्रतिनिधी विनायक गावस हे बातमीसाठी गेले असता त्यांना नाहक गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. त्यामुळे पत्रकारावर अन्याय झाला आहे.त्यामुळे यापुढे पत्रकारांना काम करणे कठीण होणार आहे.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला चिरडण्याचा प्रयत्न होत आहे. तो कदापी करू देणार नाही. या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी शुक्रवार दि.20 मे २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.दरम्यान जिल्ह्यातील इतर पत्रकारांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन श्री. आबा खवणेकर यांनी केले आहे.

काय आहे, नेमके प्रकरण..

मुद्दा होता तो फक्त पुर्वकल्पना न देता करण्यात आलेल्या भारनियमनाचा. सावंतवाडीतले वीज कार्यालय शहराच्या मध्यभागीच आहे. त्यामुळे नागरीक लगेच तिथे पोहोचले. वरिष्ठांनी फोन उचलले नाहीत, नागरीकांना स्पष्टीकरण मिळाले नाही, त्यामुळे पुढे ज्या काही घटना घडायच्या त्या घडून गेल्या.या घटनेचे फेसबुक लाईव्ह करत असताना वरिष्ठ वीज अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल चालु ठेवले असते आणि संतप्त नागरीकांसमोर वेळेत आपली बाजू मांडली असती तर कदाचित पुढील प्रसंग टाळता आला असता. ते त्यांच्याच हातात होते, हे तर स्पष्टच आहे. फेसबुक लाईव्हवर त्यांचेही म्हणणे आले असते. त्यासाठीही कोकणसाद लाईव्हचे प्रतिनिधी प्रयत्नशील होते. इतकेच काय, घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी इथल्या पोलिस निरीक्षकांना फोन करून त्याची माहितीही दिली.पोलिसांनीही आपल्या परिने परस्थिती हाताळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तसे न होता उलट पत्रकार विनायक गावस यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला. या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे श्री. खवणेकर यांनी जाहीर केले.

अभिप्राय द्या..