कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील झाराप गावचे ग्रामदेवतश्री देवी भावई चा प्राणप्रतिष्ठापना सोहळा विविध धार्मिक विधीने मोठ्या धुमधडाक्यात आज साजरा झाला. झाराप गावचे समस्त घाडी,गावकर आणि अबालवृद्धांनी “याची देही याची डोळा,” हा सोहळा अनुभवला. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला भावई चा प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा ब्राह्मण बुद्धांच्या मंत्रोच्चाराने, ढोल ताशाच्या गजरात, विविध धार्मिक विधी नी संपन्न झाला. सोमवारी (ता.२) ला देवी भावई मूर्ती ची भव्य दिव्य मिरवणूक काढून मूर्ति मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर होम-हवन धार्मिक विधी करण्यात आले. श्रींच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. समस्त झाराप वासियान च्या साक्षीने कलशारोहण सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी स्थानिकांनी आणि निमंत्रितांचे भजन झाले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले यशस्वीतेसाठी झाराप वासियांनी खुप मेहनत घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page