You are currently viewing आता तुमच्या फोनमधील ‘व्हॉट्स ॲप’ ग्रुपमधील सदस्‍य संख्‍येत करता येणार एवढी वाढ.;जाणून घ्या..

आता तुमच्या फोनमधील ‘व्हॉट्स ॲप’ ग्रुपमधील सदस्‍य संख्‍येत करता येणार एवढी वाढ.;जाणून घ्या..

पुणे /-

सोशल मीडियामध्ये सर्वात लोकप्रिय माध्यम कोणतं, असा प्रश्न केल्यास बहुतांश जण त्याचे उत्तर व्हॉट्स अॅप असेच देतील. हे अॅप आपल्या युझर्सना नेहमी हटके आणि धमाकेदार फिचर देत असल्याने सोशल मीडिया युझर्समध्ये त्याची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत आहे. व्हॉट्स अॅपने आता आणखी एक नवे फिचर आपल्या युझर्ससाठी आणले आहे. आता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये असणाऱ्या सदस्यसंख्येत वाढ करण्याचा कंपनीचा विचार सुरु आहे.

WhatsApp Group : काय आहे नवे फिचर?

मेटा कंपनीचा (META) सीइओ मार्क झुकरबर्गने दोन दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरची घोषणा केली होती. या फिचरमध्ये इमोजीद्वारे तुम्ही रिअॅक्शन्स देवू शकणार आहात. ही खुशखबर त्यांनी युझर्सना दिली तोपर्यंत त्याने आणखी एक खुशखबर आपल्या युझर्ना दिली आहे. ती म्हणजे व्हॉट्स अॅप ग्रुपमधील २५९ सदस्यसंख्या आता ५१२ एवढी वाढवता येणार आहे.

अभिप्राय द्या..