मालवण /-

कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम या निसर्गप्रेमी संस्थेकडून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या १०९ पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडण्यात आले. यावेळी मालवण तालुक्याचे तहसीलदार अजय पाटणे वनविभाग अधिकारी परीट, कांबळे, परब, वायरी भूतनाथचे सरपंच घनश्याम ढोके तसेच कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचे आनंद बॉबर्डेकर, दर्शन वेंगुर्लेकर, डॉ. प्रसाद धुमक, रुपेश तळवडेकर, समाजसेविका व निसर्गप्रेमी शिल्पा यतीन खोत, तनिष्का यतीन खोत, पर्यटन संस्थेचे संस्थापक व निसर्गप्रेमी रवींद्र खानविलकर, अध्यक्ष सहदेव साळगावकर, उपाध्यक्ष अभय पाटकर, सदस्य देवानंद लोकेगावकर वायरी भूतनाथ ग्रामपंचायत सदस्य मनोज झाड, नंदू झाड, संदेश तळगावकर उपसरपंच नाना नाईक, अन्य पर्यटन व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. अलिकडच्या काळात कासव संवर्धन मोहिमेला सिंधुदुर्गात बळ मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page