You are currently viewing सावंतवाडीत होणाऱ्या भंडारी वधु-वर मेळाव्यासाठी कुडाळ तालुक्यातील भंडारी समाजबांधवांनी सहभागी होण्याचे कुडाळ तालुकाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर यांचे आवाहन.

सावंतवाडीत होणाऱ्या भंडारी वधु-वर मेळाव्यासाठी कुडाळ तालुक्यातील भंडारी समाजबांधवांनी सहभागी होण्याचे कुडाळ तालुकाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर यांचे आवाहन.

कुडाळ /-

सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने १५ एप्रिलला वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा मेळावा सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या नवरंग कलामंच हॉलमध्ये १५ एप्रिल रोजी स. १०:०० ते सायं. ४:०० या वेळेत होणार आहे. यावेळी भंडारी समाजातील जास्तीत-जास्त वधू-वरांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कुडाळ तालुका अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.वधु- वरांसाठी प्रवेश फॉर्म हे गजानन फर्निचर शोरूम ,शिवाजी नगर कुडाळ येथे उपलब्ध केले आहेत,अधिक माहितीसाठी या 9422633183 दूरध्वनीवर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा