You are currently viewing गवा रेड्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी*

गवा रेड्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी*

*वैभववाडी तालुक्यातील कोकीसरे येथील शैलेश गावडे यांच्यावर गव्याने हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री ११.१५ वा घडली आहे. यात गावडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावडे वैभववाडी शहरातून रात्री ११ वा दुचाकीने घरी जात होते. कोकीसरे पालकरवाडी येथे त्यांचे घर आहे. घरापासून काही अंतरावर समोरून येणाऱ्या गव्याने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर गावडे यांच्यावर हल्ला केला. यात गावडे यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. गाडीचेही मोठे नुकसान झाले. सध्या त्यांच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या भागात गव्यांचा वावर वाढला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थां मधून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा