You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे माझ्यावर जी कारवाई करतील ती मला मान्य आहे.;धीरज परब मनसे जिल्हाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे माझ्यावर जी कारवाई करतील ती मला मान्य आहे.;धीरज परब मनसे जिल्हाध्यक्ष

माझ्यावर कारवाई व्हावी अस कोणाच वैयक्तिक मत असेल तर, ती कारवाई करुन दाखवावी मी समर्थ आहे.

कुडाळ /-

पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर कारवाई अटळ असे कोण सांगत असतील तर त्यांचे चे वैयक्तिक मत आहे.पक्षाचे नाही मी केलेल्या कारवाई संदर्भात आज पर्यंत कोणत्याही नेत्याचा निरोप अथवा फोन काॅल हि मला नाही.जिल्ह्यातील संपूर्ण पक्ष संघटणा स्थापने पासुन आता पर्यतचा लेखाझोका,सोडुन गेलेले पदाधिकारी त्यांची कारणे, महीला संघटणा जी स्थापनेच्या वेळी सक्रीय होती आता नाही.

संपर्क अध्यक्ष कार्यरत का नाही, व इतर जिल्ह्यातील पक्षातील घडामोडी, वाद विवाद यावर मुंबई स्थित नेते व मा. राज साहेब यांची आम्हा पदाधिकारी सोबत चर्चा, विचार विनिमय बैठक गुढीपाडवा मेळाव्या नंतर होणार आहे.त्या बैठकीत चर्चा करुन बर्याच गोष्टीवर निर्णय होतील ते सर्वासाठी मान्य असतील, या सर्व गोष्टी या पक्षांतर्गत बाबी आहेत.

पक्ष शिस्ती प्रमाणे त्या माध्यामा पासुन दुर असाव्यात या मताचा मी आहे.पण पक्षाच्या स्थापने नंतर सात आठ वर्षानी पक्षात प्रवेश घेऊन आम्हाला कोण म्हणत असेल पत्राला /अहवालाला किंमत आमच्या पक्षात नाही त्यांनी आपली प्रवेशाची आणि पक्ष स्थापनेची तारीख तपासुन घ्यावी.पक्ष सिंधुदुर्ग स्थापन करणार्या पहिल्या तिन व्यक्ती मधला मी एक आहे.अहवालाला / पत्राला किंमत नसेल तर तो प्रसिध्दी माध्यमांना प्रसिध्दी करिता देवुन टाकावा.

खेडमध्ये दोनशे माणसं घेऊन प्रवेश केलेले आज कोण कीती मनसेत आहेत?? याची आकडेमोड करावी . माझे अज्ञान आणि सज्ञाना वर असच कोणी बोलु नये. मी प्रामाणिकपणे सामाजिक क्षेत्रात काम करणारा व्यक्ती आहे. आज पर्यंत पक्षाच्या नावाचा कुठेतरी गैरवापर किंवा पक्षाचे नाव बदनाम करायच अस काम मी केल नाही.हे संपूर्ण समाजाला माहीत.त्यामुळे मी मुंबईस्थित नेते, साहेब याची बैठक/ चर्चा विचार विनिमय होई पर्यत माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. मला आज पर्यंत मिळालेली पद हि न मागता , न लोबींग करता,न कुरघोडी करता, पक्षाच्या वरिष्ठांनी विश्वासाने दिली. ती गेल्यास मला काही दुखः वाटणार नाही.त्यामुळे बैठकी आधी नेत्यांच्या चर्चे आधी माझ्यावर कारवाई व्हावी अस कोणाच वैयक्तिक मत असेल तर कोणी ती कारवाई करुन दाखवावी.मी समर्थ आहे.पक्षाची ध्येयधोरणे आम्ही आत्मसात करूनच काम करत आहोत.आणि ते आम्ही करणार गेली सोळा वर्षे पक्षाशी एकनिष्ठ आहोत आणि यापुढे राहणार.असे मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे.

अभिप्राय द्या..