You are currently viewing कोटयावधी रूपयांचा महसूल वसुल न केल्या प्रकरणी सावंतवाड़ी तहसीलदार यांच्या विरोधात आंदोलन..

कोटयावधी रूपयांचा महसूल वसुल न केल्या प्रकरणी सावंतवाड़ी तहसीलदार यांच्या विरोधात आंदोलन..

सिंधुदुर्गनगरी /-

वरिष्ठ न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुंन जाणीव पूर्वक कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सावंतवाड़ी तहसीलदार राजाराम म्हात्रे याच्या विरोधात आज माजगांव चिपटेवाड़ी येथील सामाजिक कार्यकर्ते एल. एस. नीचम यांनी आज ओरस येथील जिल्हाधिकारी कार्यालय या समोर आंदोलन छेडले आहे.

बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी ३४९ कोटी, २९लाख,७६हजार,८००रुपए दंडात्मक रकमेची पावणे दोन वर्ष झाली तरी अद्याप वसूली कलेली नाही. ही वसुली सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या वेतनातून वसूल करावी असे या नीचम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सावंतवाडी चे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना उपविभागीय दंडाधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिलेल्या गौणखनिज गौण खनिज अपील क्रमांक 5 /2019 /176, दि. 29, 09 ,2020 ची अंमलबजावणी करून रक्कम३४९कोटी,२९लाख,७६हजार,८०० रुपये वसूलकरण्या चे आदेश दिले मात्र ही रक्कम वसूल करण्यास तहसीलदार म्हात्रे जाणीवपूर्वकदुर्लक्ष करुंन कर्तव्यात कसूर करत आहेत .यासाठी ही दंडात्मक रक्कम तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या वेतनातून वसुल करावी आणि त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यासाठी आंदोलन छेडले आहे अधिकारी महसूल तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री खांडेकर यांच्या आदेशाची अंमलबजावणी सोडाच परंतु याची साधी चौकशीही तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केलेली नाही. शासनाचा करोडो रुपयांचा महसूल यामुळे बुडालाआहे .

अभिप्राय द्या..