You are currently viewing वेंगुर्ले – कोल्हापूर बसफेरी सुरु

वेंगुर्ले – कोल्हापूर बसफेरी सुरु

वेंगुर्ला

       वेंगुर्ले कोल्हापूर ही बसफेरी गुरुवार ३१ मार्चपासून सुरु झाली आहे, तसेच वेंगुर्ले अक्कलकोट ही बसफेरीही सुरु होणार आहे,त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. गुरुवार ३१ मार्च पासून दुपारी १.३० वाजता वेंगुर्ले – तुळसमार्गे  सावंतवाडी – आजरामार्गे – कोल्हापूर ही बसफेरी सुरु झाली आहे. ही बसफेरी सकाळी ६.१५ वाजता कोल्हापूर – आजरा – सावंतवाडी – तुळसमार्गे – वेंगुर्ले अशी सुटणार आहे.तसेच सोमवार ४ एप्रिलपासून सकाळी ६ वाजता वेंगुर्ले – मठमार्गे – फोंडा – कोल्हापूर – अक्कलकोट ही बसफेरी सुरु होणार आहे.सकाळी ५ वाजता अक्कलकोट – कोल्हापूर – फोंडा – मठमार्गे – वेंगुर्ले अशी बसफेरी सुटणार आहे.तसेच सोमवार ४ एप्रिलपासून सकाळी ८.३० वाजता वेंगुर्ले – मठमार्गे – आजरा – कोल्हापूर अशी बसफेरी सुटणार आहे.दुपारी २.४५ वाजता कोल्हापूर – आजरा – मठमार्गे – वेंगुर्ले अशी बसफेरी सुटणार आहे.दरम्यान सध्या सुरु असलेली सकाळी ६.३० वाजता सुटणारी वेंगुर्ले – मठमार्गे – रत्नागिरी ही बसफेरी ४ एप्रिलपासून वेंगुर्ले – दाभोलीमार्गे – रत्नागिरी अशी सुटणार आहे,अशी माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक शेवाळे व स्थानकप्रमुख निलेश वारंग यांनी दिली आहे.प्रवाशांनी एस.टी. सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..