वेंगुर्ला /-

परफेक्ट अकॅडेमी पुरस्कृत, कुडाळ येथील “एक्सलन्स अवॉर्ड २०२२” समारंभ सोहळ्यात वेंगुर्ले येथील दैनिक प्रहारचे पत्रकार सावळाराम उर्फ दाजी नाईक यांना ॲड.राजीव बिले यांच्या हस्ते निर्भिड पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कुडाळ येथील मराठा सभागृहात परफेक्ट अकॅडमी तर्फे हा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी वेंगुर्ले येथील पत्रकार दाजी नाईक यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यामध्ये अकॅडेमी संस्थापक प्रा.राजाराम परब, कुडाळ तहसिलदार अमोल पाठक, उद्योजक रवींद्र पेंडसे, वेंगुर्ले न.प.चे माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप तसेच गणपत म्हस्के, सल्लागार एम. आर. परब, राजू राऊळ, दै. कोकणसाद चे संपादक सागर चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page