You are currently viewing वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने २१ रोजी विविध कार्यक्रम..

वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने २१ रोजी विविध कार्यक्रम..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोमवार दि.२१ मार्च रोजी साई मंगल कार्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ३ ते ७ वा. या वेळेत उत्सव नात्यांचा – उत्सव तीन रंगाचा – उत्सव नवचैतन्याचा हा नात्यातील हितगूज कार्यक्रम, यावेळी सहभागी महिला व महिला रसिक प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ, यासाठी प्रथम बक्षीस सोन्याची नथ, द्वितीय बक्षीस पैठणी व तृतीय बक्षीस कुकर देण्यात येणार आहेत. सायंकाळी ७ वा. भजन, सायंकाळी ७.३० वा. संयुक्त दशावतार नाट्यमंडळाचा श्रीचंद कमला हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..