You are currently viewing शिरोडा ग्रा.पं च्या माध्यमातून हिरकणी महिला ग्रामसंघ शिरोडा कडून ग्रामस्वच्छता अभियान उपक्रम

शिरोडा ग्रा.पं च्या माध्यमातून हिरकणी महिला ग्रामसंघ शिरोडा कडून ग्रामस्वच्छता अभियान उपक्रम

वेंगुर्ला /-

पर्यटकांचे आकर्षण असलेले शिरोडा बीच येथे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वेळागर समुद्र किनारी स्वच्छता रहावी, तसेच शिरोडा गाव प्लास्टिक व कचरा मुक्त रहावे या उद्देशाने शिरोडा ग्रामपंचायत च्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरोडा येथील हिरकणी महिला ग्रामसंघाच्या वतीने शिरोडा वेळागर समुद्र किनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामसंघ अंतर्गत २१ समूहातील ६० महिलांपेक्षाही जास्त महिलानी उपस्थित राहून नियोजनबद्ध साफसफाई करून स्वच्छ सुंदर गाव शिरोडा गाव अंतर्गत आदर्शवत कामगिरी केली.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) माध्यमातून आज गावस्तरावर ग्रामसंघ स्थापन झाले. या माध्यमातून अशा महिला एकत्रित येऊन गावपातळीवर असे विविध उपक्रम राबवत आहेत.अभियान यशस्वी होण्यासाठी प्रभागसंघ व्यवस्थापक अक्षता परब,सी. आर.पी साक्षी मसुरकर, सुरेखा परब,अध्यक्ष शुभांगी शिरोडकर,सचिव गंधाली करमळकर,कोषाध्यक्ष साधना परब , लिपिक वैभवी गावडे, महिला बचतगट पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. अभियान यशस्वी करून कौतुकास्पद कार्य केल्याबद्दल शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी उपस्थित महिलांचे कौतुक करून असेच उपक्रम  शिरोडा गावातील  पूर्ण परिसरात करून शिरोडा गाव स्वच्छ सुंदर बनवूया असे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा