You are currently viewing उभादांडा वाघेश्वरवाडी येथील श्री गणपतीचे विसर्जन..

उभादांडा वाघेश्वरवाडी येथील श्री गणपतीचे विसर्जन..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील प्रसिद्ध श्री गणपती मंदिरातील श्री गणपतीचे बुधवारी रात्री दहा वाजता मोठया भक्तिमय वातावरणात सागरेश्वर किनारी विसर्जन करण्यात आले. येथील श्री गणपती मंदिरात लक्ष्मीपूजनादिवशी गणपतीची प्रतिष्ठापना व होळी पौर्णिमेच्या अगोदर विसर्जन करण्याची प्रथा आहे. मंगळवारी ‘म्हामणे’ हा महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात व शिस्तबद्ध रितीने संपन्न झाला. यावेळी बहुसंख्य भाविकांनी उपस्थित राहून दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला. बुधवारी सायंकाळी भजन, ढोल ताशे, डीजे यांच्यासह गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. वाघेश्वर मंदिर, सागरेश्वर मंदिर परिसरात गणपतीचे विसर्जन मिरवणूक आल्यानंतर येथील भाविकांनी गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर रात्री सागरेश्वर किनारी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.यावेळी तालुक्यासह अन्य भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री गणपती देवस्थान उभादांडा, सर्व ग्रामस्थ व सर्वांच्या सहकार्याने व सुयोग्य नियोजनामुळे येथील धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.

अभिप्राय द्या..