You are currently viewing नगरपंचायतीच्या मालकीच्या नसलेल्या क्रिडांगणाच्या सपाटीकरणाला भाजपचा विरोध.;सत्ताधाऱ्यांनी ९ विरुद्ध ८ असा ठराव केला मंजूर

नगरपंचायतीच्या मालकीच्या नसलेल्या क्रिडांगणाच्या सपाटीकरणाला भाजपचा विरोध.;सत्ताधाऱ्यांनी ९ विरुद्ध ८ असा ठराव केला मंजूर

कुडाळ /-

सपाटीकरण झालेल्या कुडाळ येथील क्रीडा विभागाच्या ताब्यात असलेल्या क्रीडांगणाच्या सपाटीकरण्यासाठी ३५ लाख रुपयांचा नगरोत्थान निधी खर्च करू नका त्याचा अपव्यय होईल अशी भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या विशेष सभेत मांडली अखेर शिवसेना व काँग्रेस या नगरसेवकांनी सपाटीकरणासाठी ३५ लाखाच्या निधीला ठरावाने मंजुरी दिली.

कुडाळ नगरपंचायतीची विशेष सभा नगराध्यक्ष आफ्रीन करोल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, मुख्याधिकारी नितीन गाढवे, भाजपा गटनेते विलास कुडाळकर तसेच शिवसेना, भाजप, काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते या विशेष सभेमध्ये कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने नगरोत्थानचा ३५ लाख रुपयांचा निधी क्रीडांगण सपाटीकरण करण्यासाठी तसेच गटार व मैदानातील विद्युत खांब बाजूला करण्यासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे विषय पत्रिकेत नमूद केले होते यासंदर्भात भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी नगराध्यक्ष यांना विचारले की हे क्रीडांगण कुठे आहे? नगरपंचायतीचे आहे की इतर कोणाचे आहे? याबाबत मुख्याधिकारी यांनी सांगितले की क्रीडांगण क्रीडा विभागामार्फत बांधण्यात आले असून त्या ठिकाणी या नगरोत्थान निधीमधून खर्च केला जाणार आहे त्यानंतर नगरसेविका संध्या तेरसे यांनी विचारले की नगरोत्थानचा निधी सपाटीकरणावर का खर्च केला जात आहे क्रीडा विभागामार्फत आधी सपाटीकरण केलेले आहे तसेच पुन्हा सपाटीकरण क्रीडा विभागामार्फत केले जाणार आहे असे सांगितले तसेच गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितले की ही जागा किंवा हे क्रीडांगण नगरपंचायतीच्या मालकीचे आहे का? मालकीचे नसेल तर खर्च करता येतो का? असा सवाल विचारल्यानंतर मुख्याधिकारी यांनी सांगितले की आपल्या मालकीचे नसेल तर खर्च करता येत नाही मात्र संबंधित खात्याचे ना हरकत घेऊन खर्च करता येतो पण कुडाळच्या नागरिकांच्या विकासासाठी आलेला निधी क्रीडा विभागाच्या क्रीडांगणावर का खर्च केला जातो असा सवाल उपस्थित करण्यात आला तर नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सांगितले की या क्रीडांगणाच्या सभोवताली जेव्हा झाडे लावण्यासाठी विचारणा करण्यात आली त्यावेळी मुख्याधिकारी यांनी आपल्या ताब्यात जमीन नसल्यामुळे त्या ठिकाणी झाडे लावता येणार नाही असे सांगितले मग आता ही जमीन आणि क्रीडांगण जर आपल्या मालकीचे नसेल तर खर्च का केला जातो त्यापेक्षा शहरातील विकास कामांवर ३५ लाख रुपयांचा निधी खर्च करावा असे सांगून या विषयाला भाजपचे नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी यांनी कडाडून विरोध केला. अखेर याबाबत मतदान घेण्यात आले आणि सत्ताधाऱ्यांनी ९ विरुद्ध ८ असा ठराव संमत केला.

अभिप्राय द्या..