You are currently viewing क्रीडांगणाच्या सपाटीकरण्याचा ठराव कलम ३०८ प्रमाणे रद्द करण्याची भाजपा नगरसेवकांची मागणी

क्रीडांगणाच्या सपाटीकरण्याचा ठराव कलम ३०८ प्रमाणे रद्द करण्याची भाजपा नगरसेवकांची मागणी

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये सत्ताधाऱ्यांनी क्रीडा विभागाच्या ताब्यातील क्रीडांगणाच्या सपाटीकरण संदर्भातील घेतलेला ठराव नगरपंचायत अधिनियम कलम ३०८ प्रमाणे रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे करावा अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी मुख्याअधिकारी नितीन गाढवे यांच्याकडे केली आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये सत्ताधाऱ्यांनी कुडाळ शहरातील जिल्हा क्रीडा विभागाच्या ताब्यात असलेल्या क्रीडांगणाचे सपाटीकरण गटार बांधणे व विद्युत पोल हलविण्यात बाबतचा ठराव मंजूर केला मात्र या ठरावावर भाजपच्या नगरसेवकांनी हरकत घेतली होती ही जमीन नगरपंचायतीच्या मालकीची नाही तसेच भविष्यात हे क्रीडांगण नगरपंचायतीच्या ताब्यात येणार नाही मग हा ३५ लाख रुपयांचा निधी क्रीडांगणावर खर्च का करावा असा सवाल उपस्थित केला होता दरम्यान याबाबत भाजपच्या नगरसेवकांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांना निवेदन देऊन हा ठराव नगरपंचायत अधिनियम कलम ३०८ प्रमाणे रद्द करावा असा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवावा अशी मागणी केली आहे यावेळी भाजपा गटनेते विलास कुडाळकर नगरसेविका संध्या तेरसे, सौ प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर, नगरसेवक रामचंद्र परब, अभिषेक गावडे, एड. राजीव कुडाळकर, नगरसेविका सौ. नयना मांजरेकर, चांदणी कांबळी उपस्थित होते.

फोटो मुख्याधिकारी नितीन गाढवे यांना निवेदन देताना भाजपचे नगरसेवक

अभिप्राय द्या..