सिंधुदुर्ग /-
महा विकास आघाडी सरकारच्या वतीने राज्याचा अर्थसंकल्प माननीय उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब यांनी सादर केला.सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करताना समाजातील विविध घटकांना विकसित करणारा असा हा अर्थसंकल्पआहे. विशेष करून ओबीसी समाजाला सहाय्यभूत ठरणाऱ्या ” महा ज्योतिसाठी” केली भरीव तरतूद उल्लेखनीय आहे.तर “ओबीसी महामंडळासाठी” तब्बल तीन हजार कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध करून समाज बांधवांच्या विकासाचे दालन खुले केले आहे. तसंच इंधन दरवाढीच्या ओझ्या खाली दबलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सीएनजी वरील तब्बल दहा टक्के कमी केलेला कर विशेष आशादायी आहे. कोरोना नंतरच्या काळात वेगळ्या पद्धतीने आर्थिक घडी बसवण्यासाठी आणि विशेष करून व्यापारी वर्गाला बसलेला फटका याचाही विचार करून बाजारपेठा विकासासाठी फार मोठी तरतुद ही बाब निश्चित उल्लेखनीय आहे. पर्यटन विकासाला चालना देताना आपल्या जिल्ह्यासाठी विशेष करून सिंधुदुर्ग व विजयदूर्ग किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केलेली तरतूद जिल्ह्याच्या पर्यटन विकासात भर टाकणारी ठरणार आहे.सर्वसामान्य जनते बरोबरच महाराष्ट्राला सर्व बाजूने विकासित करण्याचा करण्याची दृष्टी ठेवणारा अर्थसंकल्प निश्चित स्वागतार्ह आहे.असे प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी तथा माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे.