You are currently viewing वेतोरे देऊळवाडी येथील साई मंदिराचा १६ वा वर्धापन दिन १३ मार्चला

वेतोरे देऊळवाडी येथील साई मंदिराचा १६ वा वर्धापन दिन १३ मार्चला

कुडाळ /-

वेतोरे देऊळ वाडी येथील गुरुकृपा उद्योगालय आवारातील श्री साईबाबा मंदिराचा १६ वा वर्धापन दिन सोहळा रविवारी १३मार्च रोजी साजरा होत आहे.या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच अखंड महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त सकाळी श्रींच्या मूर्तींवर अभिषेक ,१० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, १२ वाजता आरती आणि तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अखंड महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता नेरूर येथील बाल भजन, सायंकाळी ६ वाजता येथील ह.भ.प. सदाशिव सुरेश पाटील यांचे कीर्तन, सायंकाळी ९ वाजता श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ तेंडोली यांचे भजन आणि रात्री १० वाजता खानविलकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे.तरी या सर्व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांना आणि महाप्रसादाला भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैभव गोगटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा