You are currently viewing देवगड येथे तालुकास्तरीय मासिक कॅम्प सुरू करण्यासाठी आमदार नितेश राणे यांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन.

देवगड येथे तालुकास्तरीय मासिक कॅम्प सुरू करण्यासाठी आमदार नितेश राणे यांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन.

देवगड /-

मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग आपल्या कार्यालयामार्फत देवगड जि. सिंधुदुर्ग येथे जनतेच्या सोईसाठी दरमहा ठराविक दिवशी कँपचे आयोजन करण्यात येत होते. त्यामुळे वाहन मालक व चालक यांची ओरोस मुख्यालयाला जाण्याची फेरी वाचत होती. परंतु कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये सदरहू कँप बंद करण्यात आला. त्यामुळे वाहन मालक व चालक यांची फार मोठी गैरसोय होत आहे. आता कोरोना महामारीचे संकट दूर झाले असून जनजीवन सुरळीत होत आहे. तरी देवगड येथील बंद करण्यात आलेला तालुकास्तरीय कँप पुन्हा सुरू करावा असे निवेदन देवगडचे आमदार नितेश राणे यांनी मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांना केले आहे.

अभिप्राय द्या..