You are currently viewing मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे इको गाडीला अपघात दोन जखमी..

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे इको गाडीला अपघात दोन जखमी..

कणकवली /-

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे श्री तोरसकर हॉटेल च्या समोर ईको चार चाकी गाडीचा टायर फुटून चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी तीन पलटी खाऊन झालेल्या अपघातात मनोज दशरथ नाचरे वय – ३६ राहनार दापोली व बाबू योगांण्णा राहणार केरळ वय – ५० हे दोन जण जखमी झाले आहेत.हा अपघात सकाळी ११.३० वाजता खारेपाटण रामेश्वर नगर हायवे येथे घडला.

याबाबत अधिक वृत्त असे की इको चार चाकी गाडी वाहन क्र. MH03BS3757 ही दापोली हुन सावंतवाडीला आपल्या मित्राला भेटायला जात असताना मुंबई – गोवा महामार्ग खारेपाटण रामेश्वर नगर येथे गाडी आली असता गाडीच्या समोर कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचण्याच्या प्रयत्नात गाडी रस्ता सोडून बाहेर गेल्याने टोकदार दगडावर टायर जोरदार आपटल्याने टायर फुटून मोठा अपघात झाला.व गाडीने अक्षरशः तीन पलटी मारल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले.तर गाडीतील दोघांना किरकोळ दुखापत झाली त्यांना तातडीने येथील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नागरिकांनी आणले खारेपाटण प्रा आ केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम ह्या त्यांच्यावर उपचार करीत आहे.तरी दोन्ही जखमी व्यक्तींना मुका मार बसला आहे. या अपघाताचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे अधिकारी उद्धव साबळे व पराग मोहिते करीत आहे.

अभिप्राय द्या..