You are currently viewing आजची स्त्री ही शिक्षित आहे तिने आता प्रशिक्षित बनले पाहिजे.;एम के गावडे यांचे महिलांना मार्गदर्शन.

आजची स्त्री ही शिक्षित आहे तिने आता प्रशिक्षित बनले पाहिजे.;एम के गावडे यांचे महिलांना मार्गदर्शन.

वेंगुर्ला /-

आजची स्त्री ही शिक्षित आहे, तिने आता प्रशिक्षित बनले पाहिजे.शासनाच्या अनेक योजना आज महिलांसाठी उपलब्ध आहेत,त्याचा फायदा घेतला पाहिजे.काथ्या उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मितीचे मोठे दालन खुले आहे,त्या उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वतःच्या पायावर खंबीर पणे उभे राहावे यासाठी आवश्यक माहिती देण्यासाठी शासनाचे अधिकारी उपलब्ध आहेत, त्याचा फायदा घ्या,असे आवाहन सहकारातील मार्गदर्शक तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन एम. के.गावडे यांनी वेंगुर्ले येथे केले.
महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ (MSSIDC) मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) सिंधुदुर्ग आयोजित काथ्या धोरण २०१८ अंतर्गत वेंगुर्ले येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था कार्यालयात काथ्या उद्योगाचे संवर्धन, प्रचार व प्रसार करण्याकरीता तीन दिवसीय मोफत “उद्योजकता परिचय कार्यक्रम”  आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गावडे बोलत होते.वेंगुर्ले येथील या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्गचे प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर काथ्या कारखान्याचे मार्गदर्शक एम.के. गावडे, कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा परब, तसेच महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ समन्वयक शंकर सावंत, उद्योजक अमित शेटकर, योगेश कुबल आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या योजना बाबत माहिती दिली. तर प्रज्ञा परब यांनी वेंगुर्ले कॅम्प येथे सुरू असलेल्या काथ्या कारखान्याच्या कामाबाबत माहिती देताना महिला या उद्योगातून कशा आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात या बाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यक्रम समन्वयक सुरज सावंत यांनी मानले.

अभिप्राय द्या..