You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न.

वेंगुर्ले तालुक्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न.

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातील मुख्य देवतांच्या मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असून शासनाने शिथिल केलेल्या नियमांमुळे यावर्षी भविकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.वेंगुर्ले ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात काल सकाळपासूनच दर्शनासाठी,केळी, नारळ ठेवणे साठी भाविकांची गर्दी झाली होती.या मंदिरात दासनवमी पासून महाशिवरात्री पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.रात्री श्री देवी सातेरी मंदिरातून तरंगदेवतांचे आगमन झाल्यावर पालखी व लालखी प्रदक्षिणा व त्यांनतर रथप्रदक्षिणा आदी धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या योग्य नियोजनात उत्सव संपन्न झाला.
तसेच तालुक्यात उभादांडा श्री देव सागरेश्वर मंदिर,खानोली श्री देव सिद्धेश्वर सातेरी रवळनाथ पंचायतन चा महाशिवरात्री उत्सव,मोचेमाड श्री देव गिरोबा मंदिर,मठ श्री देव स्वयंभू मंदिर,परुळेबाजार गौरीशंकर मंदिर,आरवली श्री देव वेतोबा मंदिर,म्हापण सिद्धेश्वर मंदिर येथे तसेच रेडी स्वयंभू महादेव देवस्थान, परुळे कोरजाई येथील मंदिर, आदींसह आडेली,वजराट, होडावडा,तुळस तसेच तालुक्याच्या अन्य गावातील मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.

अभिप्राय द्या..