You are currently viewing आरवली येथे उद्या ३ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

आरवली येथे उद्या ३ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला
आरवली विकास मंडळ संचलित आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र वेंगुर्ले, इर्षाद शेख फाउंडेशन, वेंगुर्ले तालुका काँग्रेस व भ. क.ल. वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार ३ मार्च रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र आरवली येथे भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भ. क. ल. वालावलकर रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. यामध्ये मणक्याचे, कमरेचे, मानेचे तसेच हाडांचे कोणतेही आजार, मासिक पाळीचे आजार, रक्तातील गाठींची तपासणी तसेच महिलांचे इतर आजार, मधुमेह, हृदयरोग, कोलेस्टेरॉल, रक्तदाब तसेच इतर तत्सम आजार, डोळे तपासणी व मोतीबिंदू परीक्षण, कॅन्सर तसेच दुर्धर आजारांची तपासणी आदी तपासण्या केल्या जाणार आहेत. डेरवण रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत रक्त तपासणी तसेच मोफत ई सी जी तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरास येताना अगोदरच्या औषधांची फाईल व जुनी तपासणी रिपोर्ट घेऊन येणे आवश्यक आहे. रुग्णांची नोंदणी आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र (०२३६६ – २२७२३२) या ठिकाणी करावी, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..