You are currently viewing आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली ते कुणकेश्वर मोफत बससेवा

आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली ते कुणकेश्वर मोफत बससेवा

कणकवली /-


आ. नितेश राणे यांच्या मार्फत कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रे साठी कणकवली ते कुणकेश्वर मार्गावर मोफत लक्झरी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या बससेवेचा शुभारंभ करताना जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते नगराध्यक्ष समीर नलावडे,उप सभापति मिलिंद मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी शहर अध्यक्ष अन्ना कोदे, संदीप मेस्त्री, महेश गुरव,शिशिर परुळेकर,गणेश तळगावकर,पप्पू पूजारे, सागर राणे,संजय ठाकुर,सदा चव्हाण ,समर्थ राणे उपस्थित होते. ऐन एसटी संप सुरू असताना मोफत लक्झरी बससेवा उपलब्ध करून देत प्रवासाची गैरसोय दूर केल्याबद्दल भाविक भक्तांनी नितेश राणे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

अभिप्राय द्या..