सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने ड्रेसर प्रकाश केळुसकर यांचा झाला सेवा निवृत्तीपर हृदय सत्कार.


सावंतवाडी /-


शासकीय नोकरीत असतांना आपण समाजाचे सेवक आहोत ही भावना ठेवूनच काम केले पाहिजे.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी प्रकाश केळुसकर यांनी हा सेवा भाव जपला आणि आरोग्य सेवा दिली.आदर्श आरोग्य सेवक असा असावा याचे प्रकाश केळुसकर हे उत्तम उदाहरण आहेत. हा सेवेचा वास प्रत्येक कर्मचाऱ्याने जपला पाहिजे.असे गौरवोद्गार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम पाटील यांनी काढले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे व्रण उपचारक प्रकाश उर्फ नाना केळुसकर हे आरोग्य सेवेतून निवृत्त झाले. त्याचा निवृत्तीपर सत्कार समारंभ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.ज्ञानेश्वर दुर्भाटकर,डॉ. पांडुरंग वजराठकर, हृदयरोगतज्ञ डॉ. अभिजित चितारी, बालरोगतज्ञ डॉ. संदीप सावंत, डॉ. निकीता मसुरकर, डॉ. गिरीश चौगुले,डॉ.निखिल अवधूत,कार्यालयीन अधीक्षक सौ.आशा मिशाळ,मेंटर्न सौ.विजया उबाळे,परिसेविका श्रीमती येळेकर,निवृत्त सिस्टर श्रीमती आरेकर आदी सह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थितीत होता. यावेळी प्रकाश केळुसकर यांचा शाल, श्रीफळ,भेटवस्तू देऊन निवृत्तीपर सत्कार करण्यात आला.त्याच्या पत्नी सौ.पल्लवी केळुसकर यांचा साडी,चोळी देऊन ओटीभरून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमा दरम्यान केळुसकर कुटुंबियांच्या वतीने आभार व्यक्त करतांना अधीक्षक डॉ.पाटील,डॉ.वजराठकर, सौ.उबाळे,श्रीमती येळेकर,श्रीमती आरेकर सिस्टर यांचा कृतज्ञता म्हणून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तर कै. आप्पा जाधव यांचे स्मरण म्हणून सिद्धार्थ जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.पांडुरंग वजराठकर म्हणाले,प्रकाश केळुसकर हे माणसे जोडणारे व्यक्तिमत्त्व आहे.त्याचे काम कृतीतूनच बोलते.स्वतःची जबाबदारी पोळवून दुसऱ्यालाही मदत करण्याची भावना केळुसकर यांच्या कडे आहे.प्रकाश केळुसकर चा कोणत्याही कामाला नाही हा शब्द नसतो.दिलेले काम विश्वासपात्र असेच करायचे.अशा कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठतेने होणारी निवृत्ती आरोग्यसेवेत नेहमीच उणीव भासणार आहे.असे डॉ. वाजराठकर म्हणाले,,
यावेळी पत्रकार संतोष राऊळ, सौ.पल्लवी केळुसकर, सामाजिक कार्यकर्ते चंदू वालावलकर, प्रवीण चव्हाण, सायली केळुसकर,श्री.सुनील सोनसुरकर,श्रीमती कशाळीकर,विठ्ठल वराडकर यांनी आपले विचार मांडले.तर उपस्थितांचे आभार गौरेश केळुसकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page