वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील समुद्रकिनारी वसलेल्या श्री देव सागरेश्वर मंदिरात शिवप्रेमी, शिवभक्त व भाविक व सागरेश्वर भक्तवृंद उभादांडा वाघेश्वरवाडी यांच्या वतीने मंगळवार १ मार्च रोजी महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सोमवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. पासून शिवपिंडीवर संततधार, मंगळवार १ मार्च रोजी महाशिवरात्री दिवशी विधीपूर्वक शिवपिंडीचे पूजन, वरदशंकर पूजा आणि होमहवन, महाआरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ४ वाजता वारकरी भजन मंडळ, सायंकाळी ७ वाजता पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ उभादांडा वेंगुर्ले यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम सादर होणार आहेत. शासन कोरोना नियमांचे पालन करून भाविकांनी दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सागरेश्वर भक्तवृंद उभादांडा वाघेश्वरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page