You are currently viewing वेंगुर्ले तालुका संजय गांधी निराधार ६४ प्रकरणे मंजूर..

वेंगुर्ले तालुका संजय गांधी निराधार ६४ प्रकरणे मंजूर..

वेंगुर्ला /

वेंगुर्ले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची मासिक बैठक यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार कार्यालय वेंगुर्ले येथे संपन्न झाली.यावेळी एकूण ६४ प्रकरणे मंजूर करण्यात आली.या सभेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना/ इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ/ श्रावणबाळ योजनांच्या ठेवण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये संजय गांधी अनुदान योजनेची ४५, श्रावणबाळ सेवा राज्य योजनेची १३, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेची ६  अशी एकूण ६४ प्रकरणे मंजूर करण्यात आली.या सभेस तहसिलदार प्रविण लोकरे, महसूल नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे,सुकन्या नरसुले, तुकाराम परब, मनोहर येरम, मकरंद परब,अरविंद  बागायतकर, सुरेश भोसले, गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी शेट्ये, निलेश मयेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..