You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर नविन चेहऱ्यांना संधी.;जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर नविन चेहऱ्यांना संधी.;जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक

कुडाळ /-

गेल्या काही दिवसांपासून बरखास्त केलेली सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी आज पून्हा नविन चेहऱ्यांना संधी देऊन युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी जाहीर केली,आजची युवक जिल्हा कार्यकारिणी जाहीर करताना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केली असून आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तरूणांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संधी देण्याचा विचार असून युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून. पुढील निवडणुकांची रणनीती ठरविण्यात येईल.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याची तयारी युवक राष्ट्रवादी काँग्रेस करत असून त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

तसेच सद्या पक्ष सभासद नोंदणी कार्यक्रम जिल्ह्यात सुरू असून युवक राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण भागातील युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेत मोठ्या प्रमाणात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करून भविष्यात जिल्ह्यात युवक राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम करण्यासाठी प्रयत्न करणार,असे सांगून पक्ष सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी प्रयत्नशील असू असे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा