You are currently viewing आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचा वतीने ७/१२ मधील तांत्रिक त्रुटी दुरूस्ती करण्यात निवेदन !

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचा वतीने ७/१२ मधील तांत्रिक त्रुटी दुरूस्ती करण्यात निवेदन !

सिंधुदुर्ग /-

शासनाच्या ऑनलाईन ७/१२ प्रक्रियेमध्ये तसेच मूळ ७/१२ मध्ये असलेल्या तपशील आणि ऑनलाईन ७/१२ मधील तांत्रिक त्रुटी राहून गेल्या आहेत.या यासंदर्भातील तात्काळ त्रुटी दुरुस्ती करून शेतकऱ्यांचे शासकीय कार्यालयामध्ये येण्याजाण्याचे हेराफेरी कमी होण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे पाठपुरवठा करण्यात आला आहे.७/१२ मधील शेतकऱ्यांचे किंवा जमीनदारांची काही चुका नसताना.शेतकरी संबंधित तलाठ्याच्या चुकी निदर्शनास आणून जेव्हा देतात तेव्हा तलाठी दुरुस्त करून देत नाही एक तर शासकीय कार्यालयात एक तर तीन ते चार वेळा तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांला तलाठी तहसीलदार कार्यालय जाण्याचा सल्ला देतात. दुरुस्तीनंतर 15 ते 20 दिवस थांबायला सांगितले जाते.असे निदर्शनास येते शेतकरी,मजूर,जमीनदार यांचे खच्चीकरण होते बाब गंभीर असून जिल्हाधिकारी त्यांनी शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ऑनलाईन ७/१२ मधील तपशील यामधील त्रुटी दुरुस्ती करण्यात यावे व शेतकऱ्यांना यापासून दीलासा मेळावा यासाठी आंतरराष्ट्रीय वेल्फेअर असोसिएशनच्या जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे पाठपुरवठा करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..