You are currently viewing मांडकुली येथे युवा फोरमच्या निबंध व वक्तव्य स्पर्धेला मुलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

मांडकुली येथे युवा फोरमच्या निबंध व वक्तव्य स्पर्धेला मुलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

कुडाळ /-

शिवजयंती निमित्त पू. प्रा. शाळा मांडकुली नं.१ येथे युवा फोरम भारत संघटनेच्या वतीने गाव मर्यादित निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.सर्वप्रथम दीपप्रज्वलन व विद्येची देवता श्री सरस्वती मातेच्या व शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी मांडकुली गावचे प्रथम नागरिक मा.सरपंच तुषार सामंत, उपसरपंच दिलीप निचम, युवा फोरम अध्यक्ष यशवर्धन राणे,उपाध्यक्ष अमोल निकम, सचिव ॲड. हितेश कुडाळकर, मुख्याध्यापिका श्रीम. वेंगुर्लेकर, ग्रामसेविका इर्जिन फर्नांडिस, ग्रा प सदस्य सुरेश पेडणेकर, माजी सरपंच सचिन साळसकर, माजी सरपंच तातू मुळीक, माजी शिक्षक मंगेश मराठे, महिला बचत गट सी आर पी रिया परब, सर्व युवा फोरम टीम, शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते. वयोगटामध्ये – लहान ( 1 ली ते 4 थी ) विषय – निबंध स्पर्धा १विघ्नेश गोविंद मसुरकर ,दुर्गेश दिलीप गावकर संतोष रवींद्र कारुडेकर विषय – वक्तृत्त्व स्पर्धा 1.प्रज्ञेय हरेश नेमळेकर 2.लीना संदीप नेमळेकर 3.वेदांत विजय साऊळ वयोगट मोठा – 5 वी ते 7 वी विषय – वकृत्व स्पर्धा 1.सौजन्या सुरेंद्र खोत 2.पार्थ गुरुनाथ लाड ,.यशस्वी महादेव मुळीक विषय – निबंध स्पर्धा ,1 दर्शना आनंद मराठे ,2 सिद्धी गोविंद मसुरकर ,3 निकिता रवींद्र कारूडेकर

अभिप्राय द्या..