You are currently viewing मुळदे येथे महाशिवरात्री उत्सव २६ फेब्रुवारी पासून सुरू.

मुळदे येथे महाशिवरात्री उत्सव २६ फेब्रुवारी पासून सुरू.

कुडाळ /-

मुळदे येथील ओम श्री नवनाथ श्रद्धस्थान तपोभूमी मुळदे कुडाळ येथील ओम नवनाथ उपासक श्री बाळकृष्ण घडशी महाराज यांच्या तपोभूमी मुळदे येथे शनिवार दि. २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत महाशिवरात्री उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२६ ते २८ फेब्रुवारी पर्यंत शिवलीला पारायण १ मार्च रोजी पहाटे काकड आरती सकाळी १० ते १२ या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद,सकाळी ११ ते १ वा. हभप सामंत यांचे किर्तन ,दुपारी ३ ते ६ वा. हभप वासुदेव सडवेलकर आंदुर्ले यांचे किर्तन ,सा.६ ते ७ एकनाथ ढवळे यांचे वाचन, साय ७ ते ८ वा. निवजेश्वर प्रासादिक भजन मंडळ निवजे यांचे भजन, रात्री ८ ते ९ वा.पालखी प्रदक्षिणा,रात्री ९ ते ११ , रात्री ९ ते ११ वेताबांबर्डे कदमवाडी यांचा हरिपाठ आदी कार्यक्रम होणार आहेत.तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांची कोरोनाचे नियम पाळून घ्यावा असे आवाहन मुळदे येथील ओम श्री नवनाथ श्रद्धस्थान तपोभूमी मुळदे कुडाळ येथील ओम नवनाथ उपासक प.पू. श्री बाळकृष्ण घडशी महाराज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..