You are currently viewing ३० तास घटनेस उलटूनही मृतदेह अजून पर्यत शिरोडा रुग्णालयातचं

३० तास घटनेस उलटूनही मृतदेह अजून पर्यत शिरोडा रुग्णालयातचं

पोलीस गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करत असल्याने मृतदेह ताब्यास घेण्यास नातेवाईकांचा नकार.

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील पेंडुर- सातवायंगणी येथे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकाम ठिकाणी मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता सदर घटनेस ३० तास उलटले तरी या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस यांनी गुन्हा दाखल न केल्याने कामगारांच्या नातेवाईकांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दर्शविला आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील सात वायंगणी येथे मातोंड पेंडुर सातवायंगणी ते घोडेमुखकडे जाणारे रोडवरील पुलाचे काम सुरू आहे. हे काम करीत असलेले दोन कामगार शनिवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ च्या सुमारास ढिगाऱ्याची माती अचानक कोसळुन त्याखाली ते गाडले गेल्याने मृत्यू झालेले होता . यामध्ये गोपीनाथ रामू राठोड, वय-52 वर्षे, रा. कोळयाल तांडा, ता-हुनसगी जिल्हा- यादगिर, राज्य कर्नाटक आणि ओमप्रकाश तेजूनायक राठोड वय-32 वर्षे, रा.शेवालाल कॉलनी, येलगी तांडा, ता-हुनसगी जिल्हा-यादगिर, राज्य-कर्नाटक याचा मृत्यू झाला होता.या घटनेची नोंद वेंगुर्ला पोलिस घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करीता नेले होते.परंतू सदर घटनेची चॉकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मृत्यू झालेल्या कामगारांची होती. परंतु याबाबत पोलीस चालढकल करत असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जातेय.

प्रतिक्रिया व्यक्त करा