सावंतवाडी /-
निरवडे कोनापाल स्वयंभू जागृत श्री देवी भराडी मातेचा वार्षिक गोंधळ उत्सव आज संपन्न होत आहे. यादिवशी आज सकाळपासून अभिषेक, पूजाविधी, ओटी भरणे, नवस बोलणे व नवस पूर्ण करणे इत्यादी कार्यक्रम सुरु आहेत. रात्रौ ठिक १० वाजता गोंधळाला सुरुवात होणार असून, मशाल, दिवटया पालखी सोहळा कार्यक्रम होणार आहे. तर बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. तर गुरूवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२२रात्रौ ठिक ९ वाजता दशावतार नाटयप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक व भक्तगण यांनी उपस्थित राहावे असे आव्हान निरवडे कोनापाल ग्रामस्थांनी केले आहे. स्थानिक प्रशासनांच्या कोरोना विषयक अटी पालन करून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.