You are currently viewing कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा स्तुत्य उपक्रम.;सहा महिन्याचे मानधन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराला देणार.

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा स्तुत्य उपक्रम.;सहा महिन्याचे मानधन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराला देणार.

कणकवली /

 शहराचा प्रथम नागरिक या नात्याने शहराचा सर्वांगीण विकास करणे हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे येत्या शिवजयंतीला 19 फेब्रुवारी रोजी कणकवली शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या स्थलांतर आणि सुशोभीकरणासाठी माझे दर महिना पंधरा हजार याप्रमाणे सहा महिन्यांचे ९० हजार मानधन मी शिवचरणी अर्पण करत आहे, अशी घोषणा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली. कणकवली येथे नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, ऍड. विराज भोसले, महेश सावंत आदी उपस्थित होते.

ही रक्कम छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ यांना देण्यात येणार आहे. यापूर्वी नगराध्यक्षपदाचे वर्षभराचे मानधन १ लाख ८० हजार रोजंदारीवर असणाऱ्या मजुरांना कमळ थाळी करिता व त्यापूर्वी नगराध्यक्षपदाच्या मानधनाची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. त्याचप्रमाणे पुढील सहा महिन्याचे मानधन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या करिता देण्यात येणार आहे. यापूर्वी कणकवली नगरपंचायत कडून पुतळा स्थलांतरना करिता पाचशे चौरस फुटाच्या जागेचा ठराव व त्या अनुषंगाने बाबी नगरपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवल्या आहेत. पालकमंत्री व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पुतळा स्थलांतरण या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना पालकमंत्र्यांकडून 18 गुंठे जागेची मोजणी देखील करून घेण्यात आली. त्यामुळे कणकवली शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी या कामाकरीता माझा हातभार लागावा म्हणून हा निर्णय घेतल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..